You are currently viewing कुडाळचे एसटी स्थानक सुरु करण्याची रिक्षा व्यावसायिकांची मागणी…

कुडाळचे एसटी स्थानक सुरु करण्याची रिक्षा व्यावसायिकांची मागणी…

कुडाळ

कुडाळचे जुने एसटी स्थानक सुरू करा, अशी मागणी शहरातील रिक्षा व्यावसायिकांनी केली. बुधवारी रिक्षा व्यावसायिक रिक्षा भाजप संघटनेचे अध्यक्ष अविनाश पाटील, विलास वराडकर, मनिष सडवेलकर, सतीश वर्दम यांनी कुडाळ एसटी स्थानकाचे आगार प्रमुख डी.एम. डोंगरे यांची भेट घेतली. आणि कुडाळ एसटी स्थानकावरून गाड्या सोडण्याची मागणी केली.
आगारप्रमुख डोंगरे यांनी याबाबत टोलवाटोलवी केली असल्याचा आरोप अविनाश पाटील यांनी केला. आपल्याला अजून नगरपंचायतीने ना हरकत दाखला दिला नसल्याचे डोंगरे यांनी सांगितले. तसेच पाण्याची टंचाई असल्याचे सांगितले. त्यावर पाटील यांनी तात्काळ नगराध्यक्ष ओंमकार तेली यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता, त्यांनी सप्टेंबरमध्येच आपण ना हरकत दाखला दिला असल्याचे सांगितले. पाण्याच्या सुविधेसाठी त्यांनी नगरपंचायतीच्या लाईन वरून पाईप लाईन टाकावी, त्यानंतर पाणी सुरू केले जाईल, असे सांगितले. मात्र कुडाळ एसटी प्रशासन स्थानक सुरु करण्याबाबत चालढकलपणा करीत असून दिवाळीपूर्वी सर्व गाड्या जुन्या स्थानकावरून सुटाव्यात, अशी मागणी रिक्षा व्यावसायिकांनी केली.
त्याचप्रमाणे महिलांचे टाॅयलेटचे खुप हाल होत आहेत. कुडाळ एसटी स्टॅड वर महिलांसाठी असलेले स्वच्छतागृह हे उदघाटन करून पुर्णपणे सुरू करण्याची मागणी अविनाश पाटील त्यांनी केली आहे. तरीसुद्धा स्थानिक आमदार खासदार काम पुर्ण होवुनही उदघाटन करुन लोकांची गैरसोय दुर करण्याच्या मानसिकतेत नाहित याचे आश्चर्य वाटते.

प्रतिक्रिया व्यक्त करा