*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*स्वर्ग ही बंदीखाना !*
ती कुशीत येईलच इतक्यात
चंद्रा!थांब जरा!तू मावळू नकोस
उषः किरणांनो अरे !थांबा जरा
रात्र ! अगं तूही अखेर करू नकोस..!
ती कुशीत असता !मनातही नव्हतं
दूर गेल्यावर!व्याकूळ मी होईन
स्वर्गच हा बंदीखाना !कधी तिला
मी पुन्हा माझ्या मिठीत घेईन..!
कशाला आता ही विरहाची तक्रार
अन् कशाला हे रडगाणं दुःखाचं
मला हे सोसावच लागणार होतं
हेच फलित आमच्या बेईमान प्रेमाचं..!
विरहाची असो वा मिलनाची
शेवटी रात्र ही!जागूनच काढायची
अजूनही कुशीत नाही !माझी लाडाची
कानोसा घेतो!दाराची कडी वाजायची
बाबा ठाकूर