You are currently viewing विसावा

विसावा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनघा अनिल कुळकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*विसावा*

 

मिळे विसावा मजला

माझ्या गुरुचरणापाशी

गुरु रूप मूळ ध्यानाचे

कृपा गुरुची मुक्ती पाशी… .. १

 

नाश होई अंधकाराचा

आत्मज्ञान देई गुरु शक्ती

विसावते मन उपासनेत

मिळे कर्म बंधनातून मुक्ती… . २

 

गुरुतत्त्व हेच जीवन तत्व

गुरु शिवाय जीवन अपूर्ण

वचन गुरुचे आहे मंत्र रूप

गुरुच करी जीवन परिपूर्ण… … ३

 

सद्गुरु देवता आज्ञा चक्राची

लय “स्व” चा परमानंदात

समाधान शांती गुरुकृपेत

खरा विसावा आत्मानंदात. … … ४

 

सौ. अनघा अनिल कुळकर्णी

पुणे. 🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा