You are currently viewing दशावतार महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन

दशावतार महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन

लोककला जिवंत राहण्यासाठी सावंतवाडीचे राजघराणे पुढाकार घेईल – राजे खेमसावंत भोसले

सावंतवाडी

दशावतारासह लोककला जिवंत राहण्यासाठी राजघराण्याच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येईल. या कलांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी भविष्यात लोककला केंद्र स्थापन करण्याचा मानस आहे. त्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न केला जाईल, असे अभिवचन आज येथे आयोजित कार्यक्रमात सावंतवाडी संस्थांनचेराजे श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी दिले. दरम्यान इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या स्पर्धेत लोककला टिकण्यासाठी तसेच नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. त्याचा फायदा येथील प्रेक्षकांनी व नाट्यप्रेमींनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. युवराज लखमराजे आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या “लोककला” महोत्सवाचे उद्घाटन आज श्री. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी श्री अजय दोडिया, सौ जयश्री दोडीया, युवराज लखमराजे भोसले,युवराज्ञी श्रध्दाराजे भोसले, देवेंद्र नाईक, नाथा नालंग, अनिल पटेल,भाई शिर्के ,प्राचार्य दिलीप भारमल आदी उपस्थित होते.
याप्रसंगी युवराज लखमराजे भोसले म्हणाले, लोककला महोत्सव घेऊन दशावताराला राजघराण्याने स्थान दिले. रघुनाथ महाराज, श्रीराम महाराज, श्रीमंत बापूसाहेब महाराज, श्रीमंत शिवरामराजे भोसले यांनी दशावतार नाट्य चळवळीला राजाश्रय दिला होता. श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी देखील लोककलांचा आदर ठेवून राजाश्रय दिला जाईल. त्यासाठी आम्ही निश्चितच पुढाकार घेतला आहे.
यावेळी प्रा दिलीप गोडकर यांनी प्रास्ताविक केले. तर आभारप्रदर्शन प्राचार्य दिलीप भारमल यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा