You are currently viewing राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांची घेतली भेट

राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांची घेतली भेट

 

नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांना भेटीची वेळ देवून राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा करून सोडविण्याचे केले आश्वासित . राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दरवर्षी ५सप्टेंबर शिक्षकदिनी राज्य शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.१९८४पासुन राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शासनाच्या वतीने दोन जादा वेतनवाढी देण्यात येत होत्या परंतु सन २०१४पासुन ह्या दोन जादा वेतनवाढी बंद करण्यात आल्या.यावेतनवाढीच्या बद्दल्यात रोख एक लाख रुपये देण्यात येत आहेत.परंतु या शासनाच्या निर्णयामुळे या शिक्षकांमध्ये नाराजी आहे.शासनाकडे आमदार ,खासदार यांच्यामार्फत निवेदन देऊन या शिक्षकांची मागणी शासनाकडे मांडली आहे‌.राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्या वतीने वेळोवेळे निवेदन देऊन मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, ग्रामविकास मंत्री,शिक्षण सचिव हा प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणी केली आहे परंतु शासनाकडून हा प्रश्न अद्यापही न सुटल्याने सन २०१३-२०१४चे शासन पुरस्कार प्राप्त शिक्षक उच्च न्यायालयात गेले होते.उच्च न्यायालयाने या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन जादा वेतनवाढी देण्यात याव्यात असा निर्णय दिला आहे परंतु शिक्षणसंचालक ,शिक्षण उपसंचालक, मुख्यकार्यकारी अधिकारी हे या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांनी राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या नेतृत्वाखाली बळीराम चापले,सुनिल नायक ,माया गेडाम,सुरेश गेडाम ,माधव वायचाळ सुनिल गुरव प्रदिप बिबटे यांच्या स्वाक्षरीचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुर येथे भेट घेऊन या शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून निवेदन दिले आहे व प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे .यामध्ये राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या जादा वेतनवाढी पुर्ववत सुरू करणे, राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना कायम स्वरुपी ओळखपत्र देणे,बस व रेल्वे प्रवासात ५०टक्के सवलत देणे, विविध शासकीय समितीवर निमंत्रित सदस्य म्हणुन नियुक्ती करणे, केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नती मध्ये प्राधान्य देणे,जिल्हास्तरीय बदल्यात संवर्ग १मध्ये समावेश करणे,जाहिर करण्यात आलेले पुरस्कार आचारसंहिता संपल्यानंतर लगेच वितरीत करणे, भविष्य निर्वाह निधी खात्यातील रक्कम उचलण्यासाठी बंद करण्यात आलेली बीडीएस प्रणाली सुरू करणे,यासह आदि मागण्या मांडण्यात आल्या आहेत.यावेळी उपमुख्यमंत्री यांनी राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या जादा वेतनवाढी पुर्ववत सुरू करण्यात येतील व इतर प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेऊन तेही प्रश्न सोडविण्यात येतील असे आश्वासन राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले अशी माहिती राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष दशरथ शिंगारे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली .

प्रतिक्रिया व्यक्त करा