*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नव वरीस सांगस ….. (ऐकी ल्या ना)*
सरी गये ना वरीस धाकधुक से मनम्हा
नव वरीस सांगस मना कानम्हां कानम्हां
मी उनू मी उनू लावा दिंड्या नि पताका
कसं जाईन वरीस लोके तुमनां हातम्हां….
तुम्ही करा कष्ट कष्ट फये दिसू ना मी गोड
झाडे लावा भरपूर त्यासना करा लाडकोडं
पर्यावरन सुधरी पयतीन बठ्ठा रोग
हवा शुद्ध व्हई जाई मंग कसाना हो भोग..
चुकावतसं आम्ही नी दोष वरीसले जास
रासायनिक खते ह्या आमना गयाना से फास
खते टाकी नि जमिन पुरी व्हई गयी खाटी
मंग कशी भेटीन हो सांगा तुप संगे माले रोटी…
नका करू फवारणी मधमाशा मरतीस
भरघोस पिकले त्या खूप मदत करतीस
मानूस बनना तो मानूसना तो दुश्मन
आपले हातेघाई पिकाडसं रोग अन्न….
वरीस काय करी सांगा चुका आमन्या सेतीस
डोकं ठिकाने ठेवा ना युक्त्या ऱ्हातीस बत्तीस
देव देस खूप खूप जरा कदर करा ना
आपल्या चुकासनी झोयी जरा रिकामी करा ना…
नका वाढू देऊ पाप नका वाढू देऊ ताप
नका बनू ना सोताज आपला जीवनना शाप
धरा नेकीना रस्ता नि कष्ट करा कष्ट करा
नव वरीस सुखनं खुष व्हई वसुंधरा …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: ३१ डिसेंबर २०२२
वेळ: रात्री ११:३७