You are currently viewing पुळास गावात आ.वैभव नाईक यांचे उत्साहात स्वागत

पुळास गावात आ.वैभव नाईक यांचे उत्साहात स्वागत

ग्रामस्थांच्या समस्या घेतल्या जाणून

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी कुडाळ तालुक्यातील पुळास गावात भेट दिली. यावेळी वरचीवाडी येथे शिवसैनिकांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व महिला उपस्थित होत्या. आवाज कुणाचा शिवसेनेचा, शिवसेना जिंदाबाद,बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे, आमदार वैभव नाईक साहेबांचा विजय असो अशी घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी ग्रामस्थ व शिवसैनिकांशी आ. वैभव नाईक यांनी चर्चा केली. विकास कामांचा आढावा घेतला. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व उर्वरित विकास कामे देखील पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून गावाचा विकास होत असून शिवसेनेच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, दीपक आंगणे, स्वप्नील शिंदे, शिरी नेवगी, कोराने सर, सरपंच विनया निकम, उपसरपंच आत्माराम सावंत, मोहन तावडे, सखाराम म्हापसेकर, स्मिता निकम, मनस्वी तावडे, प्रणिता सावंत, विश्राम निकम, सचिन परब, निलेश गाड, गोविंद गाड, धाकू लांबर, मोहन नाईक, महादेव तावडे, रुपेश निकम, आत्माराम घाडी, संजय पेडणेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + nine =