सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हयातील रा.म.मार्ग क्र.६६ वरील नियोजित पथकर आकारणीतून सिंधुदुर्गातील रहिवाश्यांना मुक्ती मिळावी अशी जिल्ह्यातील जनतेची भावना आहे. जिल्ह्याला उत्तर-दक्षिण जोडणारा असा एन. एच. ६६ व्यतिरिक्त दुसरा मार्गेच उपलब्ध नसल्याने जिल्हांतर्गत टोलमुक्त प्रवासाची सिंधुदुर्गवासीयांची ही मागणी अत्यंत रास्त अशीच आहे, असे आम्हाला वाटते. याबाबतचे निवेदन टोलमुक्त कृती समितीच्या वतीने आमदार नितेश राणे यांची कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भेट घेत देऊन करण्यात आली.
सिंधुदुर्गातील रहिवाश्यांना नियोजित पथ करापासून मुक्तता मिळवून देण्यासाठी आपण या सिंधुदुर्गाचे सुपुत्र या नात्याने व महाराष्ट्र विधानसभा सदस्य या अधिकारात जिल्हावासीयांच्या या रास्त मागणीची दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य त्या स्तरावर आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत अशी मागणी या कृती समितीच्या माध्यमातून यावेळी करण्यात आली. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घूर्ये, राजन नाईक, हनिफ पौरखान, नितीन म्हापनकर, जयेंद्र रावराणे, राजू पारकर, महेश नार्वेकर, विलास कोरगावकर आदी उपस्थित होते.