*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सावित्रीबाई फुले*
माझी माय सावित्राई
वंदन करू तिजला
शिक्षणाचा बाळकडू
तीने आम्हाला पाजला
तिचं आमची माऊली
शारदा नि सरस्वती
तिच्या मुळेचं मिळाली
जीवनात नित्य गती
ज्योतीबाने शिकविले
सावित्रीस ज्ञानधडे
तिच्या मुळेचं शिकलो
अंक गणिताचे पाढे
अनाथांचे मायबाप
जोतिबा नि सावित्राई
गर्द अंधारात गाई
सावित्री त्यास अंगाई
तिच्या शिक्षणाचा झेंडा
साता समुंदरा पार
ज्योत पेटली ज्ञानाची
झाला दुर अंध:कार
नका विसरू बायांनो
माझ्या सावित्रीबाईला
थोर तिचे उपकार
आपल्या गं जीवनाला
*शीला पाटील. चांदवड.*
छान!