आसोली ग्रामपंचायत पुर्णपणे भाजपामय ……
आसोली ग्रामपंचायत निवडणुकीत पाच सदस्य हे बिनविरोध निवडून आले होते व सरपंचासहीत चार सदस्य हे भाजपा पुरस्कृत पॅनल मधुन निवडुन आले होते . परंतु बिनविरोध निवडून आलेल्या पाचही ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यामुळे संपूर्ण ग्रामपंचायत भाजपमय झाली आहे .
भाजपा वेंगुर्ले तालुक्याच्या वतीने साईमंगल कार्यालयात तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता . यावेळी तालुक्यातील १३ सरपंच व १६ उपसरपंचांचा सत्कार जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी व्यासपीठावर अतुल काळसेकर , प्रभाकर सावंत , मनिष दळवी , प्रसंन्ना देसाई , सुहास गवऺडळकर , सुषमा खानोलकर , स्मिता दामले , निलेश सामंत , प्रीतेश राऊळ , सोमनाथ टोमके , वसंत ताऺडेल , साईप्रसाद नाईक , दादा केळुसकर , बाबली वायंगणकर , प्रार्थना हळदणकर , प्रसाद पाटकर उपस्थित होते .
यावेळी तुकाराम शंकर कोंबे , नेत्रा नारायण राणे , शितल विष्णु घाडी , रती मदन नाईक , प्राजक्ता रामचंद्र जाधव या ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.
यावेळी सरपंच बाळा जाधव , उपसरपंच संकेत धुरी , बुथ प्रमुख गुरु घाडी , सोसायटी चेअरमन विश्वनाथ धुरी , ग्रा.पं.सदस्य राखी धुरी , ग्रा पं.सदस्य राकेश धुरी , ग्रा.पं.सदस्य स्वप्निल राजन गावडे , महीला मोर्चाच्या सुजाता देसाई , नंदा गावडे , प्रकाश रेगे , उदय धुरी , विजय बागकर , प्रकाश धुरी , आनंद धुरी , ताता परब , निशा धुरी , मिनल धुरी , देवेंद्र धुरी , राजाराम कीनळेकर इत्यादी उपस्थित होते .