सावंतवाडीत २५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन….

सावंतवाडीत २५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन….

सावंतवाडी :

येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी सावंतवाडी शहर शाखेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर सावंतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिरामध्ये रविवार दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १.३० या वेळेत घेण्यात येणार आहे.

सावंतवाडी शहराध्यक्ष प्रदीप कांबळे, तालुकाध्यक्ष वासुदेव जाधव, तालुका सचिव मिलिंद नेमळेकर आदींच्या संकल्पनेतून सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे मुख्य अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांच्या हस्ते होणार असून शिबिरासाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष सत्यवान जाधव, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष भावना कदम, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष तेजस पडवळ आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी सावंतवाडी शहर शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा