You are currently viewing अजित पवार यांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधू

अजित पवार यांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधू

आरोग्य कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा शब्द

अनेक दिवस उपोषणास बसलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सामंत यांनी घेतली भेट

ओरोस

गेली अनेक वर्षे कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून आम्ही कार्यरत आहोत अचानक आमच्यावर शुल्क कारणाने पदमुक्त करून अन्याय केला आहे, आमच्या न्याय प्रश्नाकडे आरोग्य संचालक दुर्लक्ष करत आहेत अशी कैफियत संबंधित आंदोलन कर्त्या आरोग्य सेविकांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याकडे मांडली असता आपण आपल्या न्याय प्रश्नी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या मार्फत शासनाचे आणि आरोग्य संचालकांचे लक्षवेधू व न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले.

सिंधुदुर्ग नगरी येथे गेले आठ दिवस राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी आरोग्य सेविकांची आंदोलन सुरू आहे जो पर्यंत शासन आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही असा पवित्रा या आंदोलनकर्त्या कंत्राटी आरोग्य सेविकांनी घेतला आहे शासन कोणता निर्णय, कधी निर्णय घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा