You are currently viewing जिल्हास्तरीय जंगल वाचवा, प्राणी वाचवा दौड स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद…

जिल्हास्तरीय जंगल वाचवा, प्राणी वाचवा दौड स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद…

वेताळ प्रतिष्ठानचे आयोजन;१२ गटात स्पर्धक सहभागी..

वेंगुर्ले

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आयोजित अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत सलग ९व्या वर्षी आयोजित जिल्हास्तरीय स्वच्छता दौड स्पर्धेत खुल्या पुरुष गटातून शिवम बबन घोगळे तर खुल्या महिला गटातून हेमलता रवींद्र राऊळ अव्वल क्रमांकाची मानकरी ठरली.
शालेय मुली- मुलगे, व खुल्या पुरुष व महिला अशा एकूण १२ गटात आयोजित सदर जंगल वाचवा प्राणी वाचवा दौड स्पर्धेस जिल्ह्यातील सुमारे ३८५ स्पर्धकांनी सहभाग घेत उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने उपक्रमास प्रतिसाद देत श्री वेताळ मंदिर तुळस येथे आयोजित जिल्हास्तरीय दौड स्पर्धेचे उदघाटन माजी प.स.सभापती यशवंत परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक रंजीता चौहान, प्रमुख पाहुणे मंगेश राऊळ, विजयानंद सावंत,पोलीस दीपा धुरी,पोलीस रुपाली वेंगुर्लेकर, मुख्याध्यापक संजय परब, शिक्षक तेजस बांदिवडेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, प्रा. एम.बी. चौगले, प्रा. बी. एम.भैरट, संजय पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ‘जंगल वाचवा,प्राणी वाचवा’ विषयक संदेश देणारी क्रीडा ज्योत पोलीस रंजीता चौहान यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
यावेळी यशवंत परब यांनी प्रतिष्ठांनच्या माध्यमातून कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमा बरोबरच अनेक सामाजिक उपक्रम राबवून सलग नऊ वर्षे आदर्शवत कार्य करत आहे असे गौरोवोद्गार काढत प्रतिष्ठानचे अभिनंदन केले.
स्पर्धेचा निकाल पुढीप्रमाणे
खुला गट (पुरुष)
प्रथम क्रमांक – शिवम बबन घोगळे (वेंगुर्ला)
द्वितीय क्रमांक – विराज विठ्ठल भुते (कुर्लेवाडी, मूठ )
तृतीय क्रमांक – सिद्धेश जनार्दन हरमलकर ( न्हावेली)
खुला गट (महिला)
प्रथम क्रमांक- हेमलता रवींद्र राऊळ (वेंगुर्ला)
द्वितीय क्रमांक- श्वेता कृष्णा परब ( तुळस )
तृतीय क्रमांक – मुसरत लियाकत जद्दी ( नेमळे )
पहिली दुसरी (मुलगे)-
प्रथम क्रमांक- कु.मदन कृष्णा परब (गिरोबा विद्यालय तुळस )
द्वितीय क्रमांक – कु.मेहुल राजेश राऊळ (श्री जैतीर विदयालय तुळस )
तृतीय क्रमांक – कु विहान विठ्ठल धुरी (वेंगुर्ला शाळा नं ०१)
पहिली दुसरी (मुली)
प्रथम क्रमांक – कु. सान्वी स्वप्निल राजपूत ( वेंगुर्ला नं १ )
द्वितीय क्रमांक – कु.भक्ती लिलाधर परब (वजराठ नं १)
तृतीय क्रमांक- श्रुतिका भागो खरात (गोवर्धन विद्यामंदिर वडखोल )
तिसरी चौथी (मुली)
प्रथम क्रमांक – युक्ता सतीश राणे (वजराठ नं१)
द्वितीय क्रमांक – वैष्णवी संतोष राणे (श्री गोवर्धन विद्यामंदिर वडखोल )
तृतीय क्रमांक – वैदेही कृष्णा परब ( गिरोबा विद्यालय तुळस )
तिसरी चौथी (मुलगे*)
प्रथम क्रमांक- एकांश बुधाजी तुळसकर ( वजराठ शाळा नंबर १)
द्वितीय क्रमांक -स्वराज्य साईकृष्ण कांदे ( वजराठ शाळा नंबर १)
तृतीय क्रमांक – सर्वेश गजानन भगत (श्री गोवर्धन विद्यामंदिर वडखोल )
पाचवी सहावी (मुली)
प्रथम क्रमांक – शमिका सचिन चिपकर (कुडाळ हायस्कुल, कुडाळ )
द्वितीय क्रमांक – निवेदिता सतिश राणे ( इंग्लिश मिडीयम , स्कुल तळवडे )
तृतीय क्रमांक – भाग्यश्री महेश बाईत ( मळगाव इंग्लिश हायस्कूल, मळगाव )
पाचवी सहावी (मुलगे)
प्रथम क्रमांक – गुरुनाथ रमाकांत मांजरेकर (जनता विदयालय तळवडे )
द्वितीय क्रमांक- अथर्व संतोष राणे ( वजराठ शाळा नंबर १)
तृतीय क्रमांक – यश सचिन गावडे (वजराठ शाळा नंबर १)
सातवी आठवी (मुली)
प्रथम क्रमांक- आर्या आप्पा कापडी (नेमळे हायस्कुल, नेमळे )
द्वितीय क्रमांक- पूजा तुकाराम सावंत (जनता विदयालय तळवडे)
तृतीय क्रमांक- मैथली मंगेश कामत (जनता विदयालय तळवडे )
सातवी आठवी (मुलगे)
प्रथम क्रमांक- यश महेश राणे (आडेली हायस्कूल, आडेली )
द्वितीय क्रमांक- चैतन्य महेश राणे (वजराठ शाळा नंबर १)
तृतीय क्रमांक- चिन्मय महेश राणे (वजराठ शाळा नंबर १)
नववी दहावी (मुली)
प्रथम क्रमांक- वैष्णवी संतोष राणे (आडेली हायस्कूल, आडेली )
द्वितीय क्रमांक- निधी गुरुनाथ धुरी (नेमळे हायस्कूल )
तृतीय क्रमांक -ज्ञानेश्वरी संतोष ठुबरे (श्री शिवाजी हायस्कूल, शिवाजी )
नववी दहावी (मुलगे)
प्रथम क्रमांक -पारस शंकर जाधव (नेमळे हायस्कूल, नेमळे )
द्वितीय क्रमांक -आदित्य महादेव सुतार (माध्यमिक विद्या. पांग्रड)
तृतीय क्रमांक -रामचंद्र राजू कोळेकर (नेमळे हायस्कूल, नेमळे )
सर्व विजेत्या स्पर्धकांना ८ जानेवारी रोजी मान्यवरच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात येईल.सूत्रसंचलन गुरुदास तिरोडकर यांनी तर आभार प्रा सचिन परुळकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − three =