छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने उमटले पडसाद
वेंगुर्ले
भारतीय जनता पार्टी , वेंगुर्ला च्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान विरोधी पक्षनेते अजीत पवार यांनी केल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अजीत पवारांचा निषेध करत ” छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते ” असे अपमानास्पद वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी , अशी मागणी केली.
यावेळी ” जातीपातीत लावले तेढ – पवारांना लागले वेड , महापुरुषांचा अपमान – हेच पवारांचे अभियान , धर्मासाठी झिजला जावा – औरंग्याचा जाणुन कावा ” अश्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी अतुल काळसेकर , प्रभाकर सावंत , प्रसंन्ना देसाई , सुहास गवऺडळकर , साईप्रसाद नाईक , सोमनाथ टोमके , बाळा सावंत , प्रितेश राऊळ , दादा केळुसकर , निलेश सामंत , वसंत ताऺडेल , प्रसाद पाटकर , नाथा मडवळ , बाबली वायंगणकर , मनवेल फर्नांडीस , पपु परब , समीर कुडाळकर , प्रशांत खानोलकर , कमलेश गावडे , प्रशांत आपटे , राजन गिरप , विजय रेडकर , शैलेश जामदार , प्रणव वायंगणकर , बाळु वस्त , विजय बागकर , दादा तांडेल तसेच तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.