You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘इंग्रजी’ विषय परीक्षेत घवघवीत यश :

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘इंग्रजी’ विषय परीक्षेत घवघवीत यश :

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘इंग्रजी’ विषय परीक्षेत घवघवीत यश :

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी SOF ऑलिम्पियाड ‘ इंग्रजी ‘ विषय परीक्षेत घवघवीत यश मिळविले. या परीक्षेत एकूण तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांपैकी इयत्ता दुसरी मधील ‘कु. प्रार्थना प्रणय नाईक ‘ हिने सुवर्णपदक पटकावले व शाळेत प्रथम क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली. तर, ‘कु. वेद हरेश बेळगावकर’ याने सुवर्णपदक प्राप्त केले व शाळेत द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ‘ कु. शिवेन मयुर पेडणेकर ‘ याने सुवर्णपदक व शाळेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. इयत्ता पाचवी मधील ‘ कु. अस्मि धीरज सावंत ‘ हिने सुवर्णपदक प्राप्त करून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. व ‘कु.अस्मि धीरज सावंत ‘ हिला इंग्रजी विषय ऑलिम्पियाड मधील पुढील टप्प्यासाठी निवडले गेले. त्याचप्रमाणे , सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना शालेय मुख्याध्यापिका व सहा. शिक्षिका सौ. दिशा कामत यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे, शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना अशा स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याकरिता प्रोत्साहन दिले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा