बांदा
विलवडे ग्रामपंचायत उपसरपंचपदी विनायक दळवी यांची बिनविरोध निवड झाली. आज सोमवारी त्यांनी पदाचा कार्यभार स्विकारला. सर्वांना सोबत घेऊन माजी उपसभापती कृष्णा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विलवडे सरपंच प्रकाश दळवी, उपसरपंच श्री दळवी व सदस्यांचे यावेळी ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी माजी उपसभापती कृष्णा सावंत, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, ग्रामपंचायत सदस्या स्नेहा मेस्त्री, अपर्णा दळवी, शिल्पा धर्णे, नारायण दळवी, सानिका दळवी, गणेश दळवी, माजी उपसरपंच दिनेश दळवी, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप दळवी, परेश धर्णे, मनोज दळवी, आत्माराम दळवी, प्रमोद दळवी आदी उपस्थित होते.