काँग्रेसने लक्ष वेधले ; काम त्वरीत पूर्ण करण्यासाठी दिले निवेदन…
वेंगुर्ला :
वेंगुर्ला तालुक्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेल्या झुलत्या पुलाचे बांधकाम आजमितीपर्यंत अपूर्ण अवस्थेत आहे. आमदार दीपक केसरकर यांनी निधी उपलब्ध करुन दिला असूनही पुलाचे बांधकाम कोणत्या कारणासाठी अपूर्णावस्थेत आहे यासाठी याची खातरजमा करण्यासाठी वेंगुर्ला तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष विधाता सावंत यांनी सावंतवाडी येथील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्री.माने यांची भेट घेतली. यावेळी संबंधित ठेकेदारास सक्त ताकीद देऊन झुलत्या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत अशाप्रकारचे निवेदन देत यावर त्वरित तोडगा काढण्याची मागणही केली.
यावेळी श्री. सावंत यांच्या सोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, नगरसेवक प्रकाश डिचोलकर, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ता इर्शाद शेख, उपाध्यक्ष विजय प्रभू, मालवण तालुका अध्यक्ष मेघनाथ धुरी, दोडामार्ग तालुका अध्यक्ष वासुदेव नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकारी अभियंता श्री.माने यांनी काँग्रेस शिष्टमंडळासमोर संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून ३१ मार्च २०२१ पर्यंत संबंधित झूलत्या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याची सक्त ताकीद दिली.