You are currently viewing पणदूरतिठा प्रशालेतील विद्यार्थ्यांचे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021 मध्ये घवघवीत यश संपादन

पणदूरतिठा प्रशालेतील विद्यार्थ्यांचे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021 मध्ये घवघवीत यश संपादन

पणदुर :

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब शिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021

 

शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा या प्रशालेतील इ. 8 वीच्या विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021 मध्ये घवघवीत यश संपादन केले. यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त केली.

 

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी

इयत्ता – आठवी

1 कुमार कृष्णकांत राजेश अटकेकर

प्राप्त गुण 188

ग्रामीण सर्वसाधारण J 17/68

2 कुमार अथर्व महेश शिंगाडे

प्राप्त गुण180

ग्रामीण सर्वसाधारण J 22/68

3 कुमारी धन्वी लक्ष्मीकांत मांजरेकर

प्राप्त गुण 160

ग्रामीण सर्वसाधारण A 4/4

या सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक वर्ग यांचे संस्था चेअरमन श्री. शशिकांत अणावकर सर, संचालक डाॕ. अरुण गोडकर, प्र. मुख्याध्यापक श्री. एम. जी. कर्पे सर, पर्यवेक्षक श्री. एम. एस. पाटील सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना सौ. पी. एम. राठोड मॕडम, सौ. व्ही. व्ही. सावंत मॕडम, श्रीम. एस.एस. कुलकर्णी मॕडम व श्री. दिपक हेब्बाळकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 8 =