You are currently viewing जनतेचे सेवक म्हणून काम करा – सुरेश गावडे

जनतेचे सेवक म्हणून काम करा – सुरेश गावडे

रोणापाल सरपंच व सदस्यांचा सत्कार

बांदा

सरपंच व सदस्यांना जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले आहे. आपण जनतेचे सेवक आहोत ही भावना मनात कायम ठेवा. राजकारण बाजूला ठेवत विरोधकांचीही कामे करुन त्यांना आपलेसे करा. जनतेचा विश्चास सार्थकी लावण्यासारखे काम करा, असे आवाहन रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी केले.
रोणापाल उपसरपंच पदाची बिनविरोध प्रक्रिया संपन्न झाली. कृष्णा परब यांची उपसरपंच पदावर निवड करण्यात आली. यावेळी सरपंच योगिता केणी, उपसरपंच कृष्णा परब, सदस्य नमिता शेगडे, अश्विनी गावडे, उज्वला देऊलकर व योगेश केणी यांचा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी उदय देऊलकर यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. बाबा सावंत, सदाशिव गाड, भिकाजी केणी व मोहन गवस यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वांना सोबत घेऊन रोणापाल ग्रामस्थांना अभिप्रेत काम करणार असे सरपंच योगिता केणी यांनी सांगितले.
यावेळी बाबा सावंत, सदाशिव गाड, माजी सदस्य धोंडू भोगटे, माजी उपसरपंच पप्या केणी, दाजी केणी, तुषार देऊलकर, सागर गोठसकर, मंदार गावडे, नंदू परब, बाळू देऊलकर, मोहन गवस आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचलन उदय देऊलकर व आभार बाबा सावंत यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा