You are currently viewing जबरदस्त राऊळवाडा मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

जबरदस्त राऊळवाडा मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

वेंगुर्ला

वेंगुर्ला-राऊळवाडा येथील जबरदस्त मित्रमंडळाची ‘जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ‘ अशी रितसर धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी झाल्यानंतर राऊळवाडा येथे सुरु करण्यात आलेल्या मंडळाच्या अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी सतिश डुबळे यांच्या हस्ते तसेच कलावलय संस्थेचे अध्यक्ष बाळू खांबकर, नगरसेवक सुहास गवंडळकर, माजी नगरसेवक गिरगोल फर्नांडीस, सामाजिक कार्यकर्ते भाऊ मालवणकर, संजय गावडे, राकेश धर्णे आणि वायंगणी सरपंच सुमन कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नुतन वर्षाच्या प्रारंभी संपन्न झाले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष साबाजी राऊळ, उपाध्यक्ष-मंगशे परब, सचिव-सिद्धेश रेडकर, खजिनदार-स्वप्निल पालकर, सहखजिनदार-विवेक राऊळ, सहसचिव-अद्वैत आंदुर्लेकर, सदस्य ज्ञानेश्वर रेडकर, कौशल मुळीक, अजित राऊळ, निलेश पालकर, रोहित रेडकर, मनोज रेडकर, जितेंद्र रेडकर, गौरव राऊळ, हितेश सावंत, दर्शन राऊळ, प्रसाद खानोलकर, सुधाकर राऊळ, विनायक रेडकर, महेंद्र रेडकर, संदिप राऊळ, रसिक रेडकर, संजय भाटकर, हर्षद रेडकर, आबा रेडकर, वेदांत वाडेकर, दिनेश पाटील, साई भोई, पवन पाटील, सागर शिरसाट, लोकेश शिरसाट, निखिल नाईक, आर्यन शिरसाट, शरद राऊळ, संतोष राऊळ, आबा राऊळ, संजय केरकर, सुहास राऊळ, रवी राऊळ, राजा रेडकर, सुनिल परब, अशोक कोगांवकर, चिटू राऊळ, दिलीप मुळीक, वासुदेव परब, पपू परब, संतोष सावंत, सायमन आल्मेडा आदी उपस्थित होते.
प्रमुख मान्यवरांनी मंडळाला शुभेच्छा देताना नेहमी आपले सहकार्य लाभेल असे आश्वासन दिले. या मंडळातर्फे १३ जानेवारी रोजी आरोग्य शिबिर व रस्सीखेच स्पर्धा, १४ जानेवारी रोजी रक्तदान शिबिर व डबलबारी तर १५ जानेवारी रोजी मॅरेथॉन, चित्रकला स्पर्धा व ट्रिकसिनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन करणार असल्याची माहिती अजित राऊळ यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा