You are currently viewing मालवण शहरातील सागरी महामार्ग डांबरीकरणाचा शुभारंभ माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत होणार

मालवण शहरातील सागरी महामार्ग डांबरीकरणाचा शुभारंभ माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत होणार

मालवण शहर भाजप युवमोर्चा पदाधिकारी निनाद बादेकर यांनी दिली माहिती

मालवण

मालवण शहरातील सागरी महामार्ग डांबरीकरणाचा शुभारंभ माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती मालवण शहर भाजप युवमोर्चा पदाधिकारी निनाद बादेकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.

मालवण सागरी महामार्ग डांबरीकरण करून खड्डेमुक्त व्हावा. अशी मागणी मालवण शहर भाजप व भाजप युवमोर्चा यांच्या वतीने गणेशोत्सव काळात मालवण नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेत बांधकाम विभागाने काही प्रमाणात खड्डे बुजवले होते. पावसाळ्यात डांबरीकरणाची कामे बंद होती. संबंधित कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले होते. दिवाळीनंतर ताबडतोब कामात सुरुवात करतो असे सांगण्यात आले होते. सागरी महामार्ग डांबरीकरण लवकरात लवकर सुरू व्हावे याबाबत माजी खासदार निलेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार ११ डिसेंबर २०२२ रोजी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना बोलावून ताबडतोब हे काम सुरू व्हावे असे आदेश दिले होते.

त्यानुसार संबंधित अधिकारी व ठेकेदार एजन्सी यांनी कार्यवाही सुरू केली. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्याबरोबर ताबडतोब कामास सुरुवात करतो असे सांगण्यात आले होते. त्या अनुसरून २६ डिसेंबर २०२२ पासून संबंधित ठेकेदाराने सागरी महामार्ग साफसफाईच्या कामास सुरुवात केली. हे पाहताच कामाचे श्रेय लाटण्यासाठी युवासेनेमार्फत रस्ता डांबरीकरण न झाल्यास आंदोलन करण्याची नौटंकी केली जात आहे. श्रेयवादासाठी व प्रसिद्धीसाठी काम न करता मालवणच्या विकासासाठी युवासेनेने करावे करावे.

रविंद्र चव्हाण पालकमंत्री झाल्यापासून मागील सरकार काळात रखडलेल्या विकासकामांना गती आली आहे. कामाच्या दर्जाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. शहरातील विकास कामांचा माजी खासदार निलेश राणे यांच्यामार्फत सक्षम पाठपुरावा सुरू असून मालवण शहरासाठी दोन कोटी पन्नास लाखाचा निधी हिवाळी अधिवेशनात मंजूर झाला आहे. असे असताना न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी पत्रक बाजी व बोंब मारण्याचा केविलवाणा प्रयत्न युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पुढे करून शिवसेना ठाकरे गट करत आहे. हे जनता ओळखून आहे. विकास कामासाठी भाजप कटिबंध आहे. आगामी काळात विकासनिधी व विकास कामातून ते दिसून येईल. असेही बादेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा