You are currently viewing युवा रक्तदाता संघटनेच्या युवकांनी पुन्हा जपली माणुसकी

युवा रक्तदाता संघटनेच्या युवकांनी पुन्हा जपली माणुसकी

दोन गंभीर रुग्णांना दिले रक्त

सावंतवाडी

गोवा बांबुळी येथे तातडीने रक्ताची आवश्यकता असताना युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडीतील युवकांनी पुढाकार घेत रक्तदान केल. यामुळे दोन अतिगंभीर रूग्णांचे जीव वाचले.

दत्तात्रेय वाडीये या रुग्णाला गोवा बांबोळी येथे बायपास सर्जरीवेळी AB+ पाॅझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यकता होती तेव्हा सावंतवाडी येथून श्री गणेश यादव,श्री सर्वेश मराठे,श्री लखन पाटील यांनी गोवा बांबोळी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. तर प्रसुतीसाठी असलेल्या ७ महिन्याच्या गर्भवती महिलेला रक्तस्राव झाल्याने व रक्तपेढीमध्ये A पॉझिटिव्ह या रक्ताची कमतरता असल्याने परिस्थिती गंभीर होती यावेळी तातडीने सुदन केरकर,सातार्डा, शुभम बिद्रे,सावंतवाडी यांनी गोवा बांबोळी येथे जात रक्तदान करुन गंभीर महिलेचा जीव वाचवला.यासाठी लोकमतचे श्री संदेश पाटील हे देखील रक्तदान करण्यासाठी बांबोळी येथे हजर होते.युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी यासाठी पहाटे पासून विशेष मेहनत घेतली. तर या महिलेला एकूण १४ बॅग रक्त लागले. गोवा बांबोळी येथे जाऊन रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे व या महिला रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी मेहनत घेणारे श्री.
देव्या सुर्याजी व सामाजिक बांधिलकी चे रवि जाधव यांचे रुग्णांच्या नातेवाईकांनी व गोवा बांबोळी रक्तपेढीने आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा