You are currently viewing निरोप
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

निरोप

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… स्नेहल प्रकाशन परिवार समूह सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रो. डॉ. जी आर उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम लेख*

*निरोप*

पुन्हा एक झाडावरून पान खाली पडले ! न्यूटनचा नियमच तसा होता !! एक पिकलं पान झाडावरून खाली पडलं म्हणून , झाडाला त्याच दुःख झालं असेलही . पण काही काळ .
पानाला मात्र वाईट वाटले , त्याची सुख दुःख तो सोबतच तो मातीत मिसळणार होता !
एक इतिहासच पान लिहून तो काळाच्या पडद्याआड झाल्याचं वाईट वाटणारच ! पण त्याला त्याचे वारस मागे होते याचे भान पण होतेच !
नवं सृजनाचा कार्यात कुठतरी आपला सहभाग होता असच त्याला वाटत होते . तो असेपर्यंत ग्रीष्माचा झळा सोसल्या , वर्षा ऋतूत थंड गार झालो , श्रावणातील
रिमझिम गाणी गायली ! वाऱ्याने हिंदोळे पण दिले , गर्भरेशमी हिरवट रंग घेत कोवळे उन सुध्दा नशिबी आले . उन पाऊस वारा झेलून झाडाचं पोषण पण केलं ! मोहरलो ! फुल आली उमलली ! झाडावर फळ पण लागली !
कित्येकांना आसरा दिला माझ्या सावलीने ! त्या सावलीचा मी एक भाग होतोच ना ! मी पिकलो म्हणून काय झालं ! माझे वंशज तर नव्याने जन्माला येत होतेच ! त्याचा आंनद पण मी भोगला ! चला आता
नवीन पानांना पण जागा दिली पाहिजे !
परिवर्तन हा इथला नियम मला ही लागू होताच ! ह्याच भान कस विसरून चालेल ! एक वाऱ्याच्या झोताने आपण खाली पडलो ! अंगात त्राण पण नव्हताच ! अशक्तपणा पण गेली कित्येक दिवस आपण सहन केला ! आता मी कुणालाही नको झालो होतोच ! वानप्रस्थाश्रम घेण्यासाठी जीव धजत नव्हताच मुळी !
उत्पत्ती , स्तिथी , लय
हे कुणाला चुकले आहे का ?
सृष्टीच्या नियमात तर होत सगळं ! पण मन बुध्दी भरकटत गेली होती , झालं ते ठीकच झालं . माती वाट पहात होतीच ! केव्हा एकदा हा खाली पडेल व त्याला माझ्या कुशीत घेऊ , असच वाटत असणार मातीला पण !
काय गंमत आहे ना ! मातीची पण ! मातीतच जन्म मातीतीच विलीन ! जाता जाता माझ्या सर्व झाडावरील
पानांना आशीर्वाद तर दिलेच पाहिजेत ! काही काळ का होईना , त्यानी सोबत केली ,
त्यांच्या बरोबरच सुख दुःख
झेलली ! आयुष्याचं काही वेगळं असत का ? दिलेलं काम चोख पार पाडत , म्हातारं व्हायचं व पुढच्या पिढीला जागा द्यायची एवढंच तर हातात आहे !
नवं वर्षाच काय घेऊन बसलास आता ? सहा ऋतु, सहा रंग , सहा सोहळे हे तर उपभोगत असतोच ना ? त्यात काय एवढं ! जसा दिवस उगवतो व मावळतो तस वर्ष येणार जाणारच ! पण दिलेल्या आयुष्यात तू काय केलंस ? हेच महत्वाचे !!! चल मी येतो, मला आनंदाने निरोप द्या !!

प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी
अंकली बेळगाव
कॉपी राईट

 

प्रतिक्रिया व्यक्त करा