You are currently viewing सिंधुदुर्गच्या खेळाडूंची विभागीय शालेय नेमबाजी स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

सिंधुदुर्गच्या खेळाडूंची विभागीय शालेय नेमबाजी स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी

साहिश तळणकर सुवर्णपदक तर श्रिया नाखरे रौप्य पदक विजेती..

सावंतवाडी:

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य-पुणे व विभागीय क्रीडा कार्यालय-कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागीय शालेय नेमबाजी स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करून एक सुवर्ण व एक रौप्य पदक प्राप्त केले. नुकत्याच डेरवण,रत्नागिरी येथे घेण्यात आलेल्या विभागीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूर विभागातील सांगली,सातारा,कोल्हापूर, रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नेमबाजांनी सहभाग घेतला होता.ही स्पर्धा 10 मीटर ओपन साईट,10 मीटर पीप साईट व 10 मीटर एअर पिस्तूल या क्रीडा प्रकारात घेण्यात आली.यात कुमार साहिश दिगंबर तळणकर(मळगाव इंग्लिश स्कूल,मळगाव) याने 17 वर्षाखालील मुलांच्या गटात 10 मीटर पिस्तूल प्रकारात 400 पैकी 373 गुण मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले याच क्रीडा प्रकारात कुमारी श्रिया अतुल नाखरे (मिलाग्रीस हायस्कूल,सावंतवाडी) हिने 400 पैकी 362 गुण मिळवून रौप्य पदक पटकाविले.वरील दोन्ही खेळाडूंची रायगड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

साईश व श्रिया ही सावंतवाडी येथील उपरकर शूटिंग अकॅडमी सावंतवाडी येथील उपरकर शूटिंग अकॅडमी येथे नेमबाजीचा सराव करत असून त्यांना प्रशिक्षक श्री.कांचन उपरकर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच श्री. विक्रम भांगले यांचे मौल्लीक मार्गदर्शन मिळाले.

वरील दोन्ही नेमबाजांचे जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग शूटिंग असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा