You are currently viewing दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी

दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी

*बुलढाणा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष तथा भाग्योदय साहित्य संच उजैनकर फाउंडेशन सदस्य लेखक कवी मनोहर पवार यांची अप्रतिम काव्यरचना*

*दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी*
——————————

आज केविलवाणी अवस्था झाली देशाची !
घटना मोजतेय शेवटचा
श्वास ! वाचण्यासाठी……!!

घटनात्मक मानवी मुल्ये
रोज दडपशाहीने……
तुडविली जात आहेत
नतभ्रष्ट राजकारणी अन्
मुठ्भर हूकूमशाही
लोकांच्या पायदळी…. !

लोकशाहीचा आवळला
जातो आहे गळा …… !

मानदंड लोकशाही चे
बेशरमपणे केले जात
आहे मुळापासून नष्ट ….!

पण….. लक्षात ठेवा !
नतभ्रष्टांनो !
पहिले स्वातंत्र्य मिळाले
तरीही…….…….
….. अजून दूसरे स्वातंत्र्य
आज पुन्हा मिळवावेच
लागेल नव्याने……!

विरोधाची धार , क्षमता
काही बोथट झाली तरीही …..!

तुमच्या कृष्ण कृत्याचा
द्यावाच लागेल हिशोब !
अभूतपूर्व संकटातून हा
देश जात असतांना …….!

सुनियोजित कट ‘ कारस्थाने
शिजली असली तरीही !
आम्ही करू लोकशाही
मार्गाने सरळ विरोध
अन्……. एल्गारही !
धमण्यातून सळसळेल
रक्त आणि संघर्ष !

घरदार सोडून लाखो वेडे
उतरतील रस्त्यावर पुन्हा
धमक्यांची पर्वा न करता…..!

प्रजासत्ताकाच्या मानवी
मुल्यांना पुन्हा एकदा…. वाचविण्यासाठी …….!
*******************
मनोहर पवार
केळवदकर . चिखली
जि बुलढाणा .
9850812651.

प्रतिक्रिया व्यक्त करा