You are currently viewing कणकवली न .प .कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन…

कणकवली न .प .कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन…

नगरसेवक नार्वेकर यांच्या कृतीची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली तक्रार

कार्यालयाबाहेर दिल्या घोषणा

कणकवली

शिवसेना नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी कर्मचाऱ्याला मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा निषेध करत कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यानी दुपारनंतर काम बंद आंदोलन केले. २० ओक्टोबर रोजी कणकवली शहरातील साईनगर गार्डन च्या देखभाल दुरुस्तीच्या कामाची पाहणी करत असताना नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी कानाखाली मारण्याची धमकी व अर्वाच्च भाषेत अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार नगरपंचायत लिपिक सतीश कांबळे यांनी मुख्याधिकारी डवले आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे केली आहे. त्यानंतर आज कर्मचाऱ्यांनी नगरपंचायत कार्यालया बाहेर जोरदार निदर्शने केलीत.
नगरपंचायत कर्मचाऱ्याला जबाबदार लोकप्रतिनिधीकडून मिळालेल्या वागणुकीचा निषेध करत कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यानी दुपार नंतर कामबंद आंदोलन छेडले. या कामबंद आंदोलनात किशोर धुमाळे, प्रिंयक सोनसुरकर, मयूर शिंदे, मनोज धुमाळे, सचिन नेरकर, विभावरी करंदीकर, सतीश कांबळे, प्रवीण गायकवाड, मनोज धुमाळे, निकिता पाटकर, रमेश कदम, दीपक भोसले, यांच्या सह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + thirteen =