You are currently viewing शिरोडा ग्रामपंचायत उपसरपंचपदी काँग्रेसचे चंदन हाडकी यांची निवड

शिरोडा ग्रामपंचायत उपसरपंचपदी काँग्रेसचे चंदन हाडकी यांची निवड

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा ग्रामपंचायत उपसरपंचपदाच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे चंदन सदानंद हाडकी हे १६ पैकी १० मते मिळवून उपसरपंचपदी विराजमान झाले. काँग्रेसचे पदाधिकारी व पंचायत समिती माजी उपसभापती सिद्धेश परब यांनी यशस्वी खेळी करत शिरोड्यात काँग्रेसचा गड राखला. शिरोडा ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या लतिका रेडकर या सरपंचपदी विजयी झाल्या तर आज २७ डिसेंबर रोजी झालेल्या उपसरपंच निवडीत काँग्रेसचे चंदन हाडकी व भाजपकडून मयुरेश शिरोडकर यांनी अर्ज दाखल केले होते. यात चंदन हाडकी यांना १० तर मयुरेश शिरोडकर यांना ६ मते मिळाली.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, वेंगुर्ला शहर अध्यक्ष तथा वेंगुर्ला नगरपरिषदेतील काँग्रेसचे माजी गटनेते प्रकाश डिचोलकर, वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती सिद्धेश परब यांनी नवनिर्वाचित उपसरपंच चंदन हाडकी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच लतिका लक्ष्मण रेडकर, सदस्य अनिश्का आनंद गोडकर, प्रथमेश गणेश परब, राजन यशवंत धानजी, नंदिनी अनिल धानजी, पांडुरंग बाबू नाईक, यश परब, तात्या हाडकी, सदानंद हाडकी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा