You are currently viewing आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेअंतर्गत शहरात फेर सर्व्हे करा

आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेअंतर्गत शहरात फेर सर्व्हे करा

माजी नगरसेवक आनंद नेवगी, विनोद सावंत, केतन आजगावकर, साईनाथ जामदार यांची मागणी

सावंतवाडी

आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सावंतवाडी शहराची प्रसिद्ध झालेली यादी अपूर्ण व अयोग्य असून या यादीत गरीब गरजू लोकांची नावे समाविष्ट नसल्याने खऱ्या गरजवंताना या योजनेचा लाभ घेता येत नाही. या योजने अंतर्गत सावंतवाडी शहरात फेर सर्व्हे करून शहरातील सर्व गरजू लोकांना यादीत समाविष्ट करा, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपअधीक्षक, उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडी, यांच्याकडे केली आहे.

यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, शहर मंडल सरचिटणीस विनोद सावंत, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, शक्ती केंद्प्रमुख साईनाथ उर्फ बंटी जामदार आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा