सचिन रेडकर, संतोष कुलकर्णी, संदेश देसाई, संतोष गावडे, संजय वालावलकर, निलेश जोशी,सीताराम धुरी, तुषार सावंत, उज्वल नारकर यांचा होणार सन्मान
सावंतवाडी :
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार पत्रकार संघाने जाहीर केले आहेत. यात सावंतवाडीचे अभ्यासू पत्रकार सचिन रेडकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार संतोष कुलकर्णी, युवा पुरस्कार संदेश देसाई, ग्रामीण पुरस्कार संतोष गावडे, तर उर्वरित सहा आदर्श पत्रकार पुरस्करांमध्ये संजय वालावलकर, निलेश जोशी, सिताराम धुरी, तुषार सावंत, उज्वल नारकर, आदींची निवड केल्याचे जाहीर केले.
येत्या ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी सिंधुदुर्गनगरी येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहेत. सिंधुदुर्गनगरी येथे शासकीय विश्रामगृहात सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी देण्यात येणाऱ्या पुरस्काराबाबत चर्चा होऊन यावेळी पुरस्कार जाहीर करण्यात आले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, सचिव देवयानी वरसकर, परिषद सदस्य गणेश जेठे, नंदकुमार महाजन, उपाध्यक्ष बाळ खडपकर, खजिनदार संतोष सावंत, हरिश्चंद्र पवार, राजन नाईक, महेश सरनाईक, संतोष राऊळ, दाजी नाईक, बंटी केंनवडेकर, प्रकाश काळे, मनोज रावराणे आदींसह कार्यकारिणीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी विविध सोसायट्यांचे सदस्य, चेअरमन, ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य, सरपंच, उपसरपंच या सह विविध पदावर काही पत्रकारांची निवड झाली आहे या निवड झालेल्या पत्रकारांचा सत्कार कुडाळ येथे होणाऱ्या पत्रकारांच्या गेट-टुगेदर कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
जिल्हा पत्रकार संघाने जाहीर केलेल्या पत्रकार पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ पत्रकार संतोष कुलकर्णी (देवगड), युवा पत्रकार पुरस्कार संदेश देसाई (दोडामार्ग), ग्रामीण पत्रकार पुरस्कार संतोष गावडे (चौके मालवण) तर उर्वरित सहा आदर्श पुरस्कारामध्ये संजय वालावलकर (सिंधुदुर्गनगरी ओरोस ), निलेश जोशी (कुडाळ), सिताराम धुरी (वेंगुर्ले), तुषार सावंत (कणकवली), उज्वल नारकर (वैभववाडी), सचिन रेडकर (सावंतवाडी) आदींची निवड करण्यात आली असल्याचे जाहीर करत येत्या ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथील नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारदिन कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, असे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी जाहीर केले.