सावंतवाडी
मळगाव घाट मार्गावर खोदण्यात आलेले धोकादायक चर अखेर बुजवण्यात आले आहेत. गेले काही दिवस त्या ठिकाणी पाईपलाईन घालण्यासाठी खड्डे खणल्याने अपघात घडत होते.
याकडे सर्व पक्षियांसह राष्ट्रवादीने लक्ष वेधले होते. अखेर हे चर बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आभार मानले. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह बांधकाम अभियंता सौ. अनामिका चव्हाण यांचे लक्ष वेधून मळगाव घाटीतील चर तात्काळ बुजवण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्या मागणीची अखेर दखल घेऊ असते तर पदाधिकाऱ्यांच्या समावेत ते बुजवण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांबाबत समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी शहराध्यक्ष देवा टेंमकर, मळगाव ओबीसी तालुका अध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर, हिदायतुल्ला खान, आशिष कदम , बावतिस फर्नांडिस , इफ्तेकार राजगुरू,आदी उपस्थित होते.