You are currently viewing कै. दत्ताराम वाडकर कृतज्ञता निधी कथाकथन स्पर्धेत हर्षिता राऊळ व कु. रेश्मा पालव प्रथम

कै. दत्ताराम वाडकर कृतज्ञता निधी कथाकथन स्पर्धेत हर्षिता राऊळ व कु. रेश्मा पालव प्रथम

श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडीच्यावतीने करण्यात आले होते पु. साने गुरूजी जयंती निमित्त स्पर्धा संपन्न..

सावंतवाडी

सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडीच्यावतीने प्रति वर्षीप्रमाणे पु. साने गुरूजींच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु. हर्षिता सहदेव राऊळ हिने पहिल्या गटात व इन्सुली येथील कु. रेश्मा संदेश पालव हिने दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष कै. दत्ताराम वाडकर यांनी संस्थेकडे ठेव ठेवलेल्या निधीतुन श्रीराम वाचन मंदिरतर्फे दरवर्षी शालेय गटासाठी कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदाचे स्पर्धेचे २७ हे वे वर्ष असून सावंतवाडी तालुक्यातील इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटामध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत २३ विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे- गट पहिला (इयत्ता पाचवी ते

सातवी) कु. हर्षिता सहदेव राऊळ (मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव)- प्रथम क्रमांक, कु. तनया बुधाजी कासार (माजगांव) – द्वितीय क्रमांक, कु. मृणाली मोहन पवार (सावंतवाडी) – तृतीय क्रमांक, गट दुसरा ( इयत्ता आठवी ते दहावी) कु. रेश्मा संदेश पालव (इन्सुली)- प्रथम क्रमांक, कु. कार्तिकी अतुल कासार (माजगाव)- द्वितीय क्रमांक, कु. समृद्धी कृष्णा गवस ( मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव)- तृतीय क्रमांक यांनी यश मिळविले. कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना डॉ. जी. ए. बुवा यांनी साने गुरुजी जयंती निमित्त कथाकथनाचे औचित्य स्पष्ट करून सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष स्व. दत्ताराम वाडकर यांचे व्यक्तिमत्व विषद केले. सूत्रसंचालन कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले. बक्षीस वितरण अध्यक्ष प्रसाद पावसकर व कार्याध्यक्ष ऍड. संदीप निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण सौ. पूनम नारायण वाडकर आणि भारत सडक गावडे यांनी केले. माजी मुख्याध्यापक भरत गावडे यांनी कथाकथन कसे करावे या बाबत मार्गदर्शन केले. त्या करीता पुढीलवर्षी कथाकथन स्पर्धेपूर्वी विद्यार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करावी, असे सुचविले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व कर्मचारी व ग्रंथपाल महेंद्र पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा