You are currently viewing जिल्ह्यात उद्या किनारा स्वच्छ्ता मोहीम

जिल्ह्यात उद्या किनारा स्वच्छ्ता मोहीम

जिल्ह्यातील नागरिकांना सहभागी व्हावे;जिल्हा परिषद प्रशासक प्रजीत नायर यांचे आवाहन

ओरोस

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातुन 27 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छ करण्याकरीता समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हावासियांनी या समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रमांत सहभाग घ्यावा असे आवाहन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.
आपला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटकांची मोठ्याप्रमाणात रेलचेल जिल्ह्यात असते. जिल्ह्यात येणारा पर्यटक समुद्र किनारी भेटी देत असतो. जिल्ह्यात येणा-या पर्यटकांना स्वच्छ, सुंदर समुद्र किनारे पाहता यावेत या हेतुन 27 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 ते 11.30 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व समुद्र किनारी स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचे आयोजन श्रमदानातुन होणार आहे. तरी जिल्हावासियांनी आपल्या नजिकच्या समुद्र किनारी जाऊन श्रमदान करुन समुद्र किनारे स्वच्छ करावेत असे आवाहन प्रजित नायर यांनी केले आहे.

मालवण तालुक्यातील ग्रामपचायत तोंडवळी येथिल समुद्र किनारा स्वच्छते करीता जिल्हाधिकारी श्रीम. के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग व प्रशासक प्रजित नायर हे उपस्थित राहून प्रत्यक्ष श्रमदान करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा