You are currently viewing अमित खोत, परेश सावंत, संदीप बोडवे यांना मालवण तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर

अमित खोत, परेश सावंत, संदीप बोडवे यांना मालवण तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर

माजी खासदार निलेश राणे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ५ जानेवारीला पुरस्कार वितरण

मालवण

मालवण तालुका पत्रकार समितीच्यावतीने दिला जाणारा सन २०२२ या वर्षासाठीचा कै. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दै. प्रहारचे मालवण प्रतिनिधी अमित खोत यांना जाहीर झाला आहे. तर कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पत्रकार पुरस्कार परेश सावंत यांना तर अमित खोत पुरस्कृत बेस्ट स्टोरी अवार्ड पुरस्कार पत्रकार संदीप बोडवे यांना जाहीर झाला आहे. संदीप बोडवे यांना गतवर्षीही मालवण तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार प्राप्त झाला होता.

५ जानेवारीला मालवण येथील कार्यक्रमात माजी खासदार निलेश राणे , पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. अशी माहिती मालवण पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा