You are currently viewing राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा नागपुर येथे मेळावा

राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा नागपुर येथे मेळावा

महाराष्ट्र राज्यातील राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा मेळावा राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने दिनांक 25डिसेंबर 2022रोजी सकाळी 11 .00वाजता .ज्ञानविकास विद्यालय , नंदनवन पोलीस स्टेशन जवळ , नंदनवन कॉलनी, *नागपुर* येथे *राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर* यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे . *या* *मेळाव्याला शिक्षक आमदार नागोजी गाणार यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे* . राज्यकार्याध्यक्ष – दशरथ शिंगारे,राज्य कोषाध्यक्ष पाकिजा पटेल , राज्य सचिव – अनंता जाधव , उपाध्यक्ष दिलीप केने , राज्य प्रवक्ता सुनिल गुरव , राज्य सहसचिव – माधव वायचाळ यांचेसह राज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या विभागीय मेळाव्यात राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होणार असुन त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटनेच्या वतीने ध्येय धोरण ठरविण्यात येणार आहे.तसेच राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम व कृतीआराखाडा तयार करून तो राबविण्यासाठी शासनाकडे सादर करण्यात येणार.

मेळाव्याच्या निमित्ताने शिक्षकांचे प्रश्न शासनाकडे पोहचविण्यासाठी विविध विभागाचे मंत्रीमहोदय व सचिव यांची भेट घेऊन ते सोडविण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.तेव्हा सर्व राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन नागपूर विभागीय अध्यक्ष – ‌जगन्नाथ पोटे , विभागीय सरचिटणीस – बळीराम चापले , नागपूर जिल्हाध्यक्ष सुनिल नायक , नागपूर सचिव -शारदा रोशनखेडे , नागपूर विभागातील जिल्हाध्यक्ष -सुधाकर चरडुके, बळीराम चव्हाण , ओमप्रकाश गायधने,मनोजकुमार रहांगडाले,प्रमोद खांडेकर यांनी केलेले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा