You are currently viewing सुभानराव तथा किरण भोसले यांना श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली.

सुभानराव तथा किरण भोसले यांना श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली.

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री सुभानराव तथा किरण भोसले यांचे १७ डिसेंबर रोजी बांबुळी गोवा येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . त्यांना महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

श्री सुभानराव भोसले हे महाविद्यालयाच्या IQAC कमिटीचे सन्माननीय सदस्य होते . त्यांनी महाविद्यालयाच्या कामकाजामध्ये कर्मचाऱ्यांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केले. राजघराण्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती.

ते नेहमी आपुलकीने राजवाडा येथे भेट देत असत व महाविद्यालयाच्या विकासासंदर्भात आवर्जून चौकशी करत असत . यांचा सहवास अतिशय मोलाचा होता .एका चांगल्या व्यक्तिमत्त्वाला आम्ही मुकलो असे उद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एल. भारमल यांनी काढले . याप्रसंगी महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =