You are currently viewing महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनीताताई गवंडे यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनीताताई गवंडे यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनीताताई गवंडे यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने सुनीताताईंचे हार्दिक अभिनंदन; २०२९ मध्ये सक्षम महिलांना उमेदवारीची संधी देण्याची अपेक्षा

सिंधुदुर्ग :

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका जी लांबा यांच्या आदेशानुसार सुनीताताई गवंडे यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
सुनीताताई गवंडे यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, माजी महिला काँग्रेस महासचिव तसेच नागपूर ग्रामीण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून संघटनात्मक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. नागपूर विभागातील अभिजित वंजारी यांच्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नागपूर विभागाला महाराष्ट्रातील महत्त्वाची जबाबदारी देत पक्षाने नागपूरचा सन्मान वाढविला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी शिल्पी अरोरा यांच्या हस्ते सुनीताताईंना प्रदेशाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सुनीताताईंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महिला काँग्रेसची संघटना अधिक सक्षम, मजबूत आणि गतिमान होईल, असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांना योग्य ताकद, संधी आणि नेतृत्वाचे व्यासपीठ मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
विशेषतः २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक कर्तृत्ववान आणि सक्षम महिलांना उमेदवारीची संधी देऊन महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. महिलांना केवळ संघटनेत काम करण्याचीच नव्हे, तर निर्णयप्रक्रियेत आणि सत्तेच्या सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले.
या नियुक्तीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी समीर वंजारी, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष आणि महिला काँग्रेस परिवाराच्या वतीने सुनीताताई गवंडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा