तळेरे:
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिन उत्साहात आणि विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
आयोजित केलेल्या कार्यक्रमाला स्थानिक व्यवस्थासमितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, शाळा समितीचे सदस्य तथा माजी सैनिक रविंद्र पाताडे, प्राचार्य मधुकर खाड्ये, पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर, जेष्ठ शिक्षिका सौ.बी.बी.बिसुरे, सौ.आर.ए.कासार्डेकर व गणित विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. प्रारंभी गणित विभागाच्या वतीने मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य एम.डी. खाड्ये यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून व रविंद्र पाताडे यांच्या हस्ते गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
त्यानंतर इ.५वी.तील विद्यार्थ्यांनी अतिशय लयबद्ध असे गणितीय नृत्य सादर केले. याशिवाय गणितीय रांगोळी, गणितीय गाणं व गणिताच्या कवितांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या केले.
याप्रसंगी बी.बी. बिसुरे, एन.सी. कुचेकर, प्राचार्य एम.डी. खाड्ये, रविंद्र पाताडे व स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर,आदींनी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने विशेष मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
दरम्यान गणित मेळावामध्ये विद्यार्थी साहित्य निर्मिती,शिक्षक साहित्य निर्मितीचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.विशेष म्हणजे विद्यार्थ्यिनींनी घातलेली गणितीय रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
दुसऱ्या सत्रात वेदीक गणित कार्यशाळांमधून विद्यार्थ्यांना गणितातील सोप्या युक्ती शिकवण्यात आल्या.त्यानंतर प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाली. राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने गणित विषयावर आधारित विविध विद्यार्थी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
*स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे-*
*गणितीय साहित्य निर्मिती स्पर्धा -*
अनिश विचारे (इ.११वी विज्ञान) -प्रथम, कु.वैष्णवी गायकवाड (इ.१२वी विज्ञान)- द्वितीय, अश्मेश लवेकर (इ.६वी) – तृतीय,
*गणितीय रांगोळी स्पर्धा*
कु. श्रीजा पाटील व कु.अपुर्वा सावंत (इ.१२वी विज्ञान)- प्रथम, कु.जान्हवी घाडीगांवकर व किर्ती इंदुलकर (इ.१२वी विज्ञान) – द्वितीय, कु. विधी चव्हाण, कु. शिवानी जाधव व कु. रिद्धी राणे (इ.६वी ,) तृतीय आले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.व्ही. राणे यांनी करताना रामानुज यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. केले.सुत्रसंचालन गणित विभाग प्रमुख सौ.व्ही.व्ही.मुद्राळे यांनी केले. आभार सौ. मिठबांवकर डी.डी. यांनी केले.