You are currently viewing परिघ

परिघ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री भारती चव्हाण लिखित अप्रतिम काव्यरचना*

*परिघ*

*तिच्या मनाचा परिघ*…
कधी विस्तारत जातो..
.कधी आकुंचित होतो..
.परिघ विस्तारतो तेव्हा

असते नवलाई नवख्या क्षणांची….
जिंकलेल्या क्षणांची…
शब्द होतात माणकं..
होतात मनोरथं…

मनोरंजनाची मग जणू
शृंखलाच* चालते..
मधुर रूंजन घालणारी..
स्वप्नांच्या दुनियेत समरसणारी.

आनंदाचा रांजण भरणारी..
परिघाची मूर्ती..
गोलाकार…आरक्त अशी..
पण जेव्हा परिघ दुणावतो

तेव्हा होतात यातना..
वेदना*..न शमणारे घाव..
.पण जर परिघच
तुटायला आला तर…

मग उडतात ठिणग्या
.ऐकू येतं किंचाळणं..
स्वप्नांचं बेमालूम तुटणं…
हाहाकार…

सर्वत्र पसरलेला बेमालूम !.

– *भारती चव्हाण*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा