You are currently viewing भांग पडतं नाही !माझा…..!

भांग पडतं नाही !माझा…..!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचे सन्माननीय सदस्य बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*भांग पडतं नाही !माझा…!*

पूर्वी भटकणारे सैरावैरा केस
मनाच्या जावळीतून फिरायचे
हल्ली कंगव्याचे दातही वाट विसरले
विंचरतांना हात मागेच खेचायचे..

आयुष्य विंचरता विंचरता
भांग ही आता पडेनासा झाला
आईनेच भांगेची रेष काढून दिली
मोठ्या दातांचा कंगवा वाट विसरला..

आताश्या आरश्या समोरचा फिरणारा
कंगवाच माझा हात मागे खेचतो
केसांवर माझ्या!आईचं खूप प्रेम होत
भांगहिन चेहरा त्याला अनोळखी वाटतो

खरंतर!आरसा माझा जवळचा मित्र
मी जेव्हा रडतो !तेव्हा तो हसत नाही
केसांचा भांग मी आईचा विस्कटला
आईसारखा तो मला रागावत नाही

हरएक आईला तिचा मुलगा हिरो वाटतो
माझ्यासोबत माझ्या केसांना ती सदैव जपायची..
घराबाहेर पडतांना मला निरखून बघत
माझ्या केसांवरून एक नजर फिरवायची

आई! तर आता कधीच निघून गेली
आयुष्य विंचरता विंचरता!सरळरेषा ही पडेनासी झाली..
आरश्यातुनचं बघत असते ती मला
तिच्या हिरोची!प्रतिमा आरश्यानं जपली

आता !भांग पडत नाही माझा
बोटांनीच केसांना वळण देतो
आरसाच जपलेली माझी प्रतिमा
आईला वारंवार दाखवतो….!!

बाबा ठाकूर

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =