*वक्रतुंड साहित्य समूह प्रशासक लेखक कवी जगन्नाथ खराटे लिखित अप्रतिम लेख*
*असामान्य बुद्धिमत्तेचा आधुनिक गणितज्ञ, श्रीनिवास रामानुजन….*
नुसतं,गणिताचं नाव निघालं तरी अनेकांची नाकं मुरडली जातात..अन् हे अगदी खरं आहे.कारण,गणित हा विषय आपल्या बुद्धीची कसोटी पाहणारा एकमेव विषय आहे.. मग ते संसाराचं गणित असो कि व्यवहारातलं गणित असो..
आयुष्याचं गणित,अन् व्यवहारातील गणित अगदी जवळजवळ सारखींच असतात, सर्वांना आयुष्यात सुखाची बेरीज अन् दुःखाची वजाबाकी कराविशी वाटते ..पन् तसं होत नाही.. शेवटी, सुखांत,दुःखाची बेरीज करावी लागते किंबहुना सुखांत दुःख आपोआपंच जमा होतं असंत. .. अन,क्षणिक सुख व भरमसाठ दुःखाचं, आंबटगोड आयुष्य जगावं लागतं….
मुख्य म्हणजे कोणतही गणित सोडवताना ते कसं सोडवावं ??: ह्यासाठी जाणत्या सद्गुरुंच मार्गदर्शन अत्यंत आवश्यक ठरतं..अन् तो मिळाला तर सर्व काही सोपं होवुन जातं….
गणित विषय हा आपल्याला अवघड वाटत असला तरी काही असामान्य व्यक्ती मात्रं गणितांत अत्यंत तरबेज असतात किंबहुना गणीत म्हणजे हातचा मळ समजून चुटकीसरशी सोडवतात. त्यांच्या कौशल्याने , अनेकांना आस्चछर्यचकीत करुन ते प्रेरणादायी ठरतात..अशा व्यक्तीमत्वात आधुनिक गणितज्ञ,श्रीनिवास रामानुजन यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल..
तामिळनाडूमधील,ईरोड गावी,२२ डिसेंबर,१८८७ रोजी श्रीनिवास रामानुजन अय्यंगार ह्यांचा जन्म झाला, श्रीनिवास अय्यंगार हे अध्यात्मिक मार्गातील असल्याने त्यांनी,आपल्या मुलाचे, महान संत,रामानुजन ह्यांच्या नावावरुन रामानुजन हे नाव ठेवले, आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी, अय़ंगार ह्यानी,इरोड मधील कापड दुकानात नोकरी सोडून ,कुभंकोनम येथे स्थायिक झाले,अन् छोटा रामानुजन,ह्यांचं ईतर विषयात जास्त लक्ष नसे,,पन् त्याला गणिताबद्दल विषेश आवड होती, आपल्या तल्लख बुद्धीने तो गणित ह्या विषयांत प्राविण्य मिळवु लागला,गणित विषयावर शोधक वृत्ती असल्याने त्याने अपुर्णांक,विदृत्तिय समाकाल, अतिगुणोत्तरीय श्रेणी,फलनाचा सिद्धांत , वर्गमूळ, घनमुळ,हृया सारखे गणितीय प्रमेय शोधले,त्यांचं गणिता सारख्या अत्यंत क्लिष्ट विषयावरचं संदिग्ध वाटणारं ज्ञान,त्या समकालीन गणितज्ञाना पटतं नव्हतं, मद्रासमध्ये कारकुनी नोकरी असताना, गणिता बद्दलचे सर्व ज्ञान. ई,कस्टम अधिकारी, केंब्रिज मंधिल ट्रिनीटी कॉलेजाचे -गणिताचे गाढे अभ्यासक, प्रो-जी, एच,हार्डी ह्यांच्या कानावर आलं,अन्, दोघांच्या सुसंवादातुन, दोघांमध्ये आत्मियता वाढली, रामानुजन ह्यांनी प्रो-एच हार्डी ह्यांना मार्गदर्शन हवे अशी अपेक्षा व्यक्त करतांच,अशा असामान्य बुद्धिमत्तेच्या युवकाच्या ज्ञानाला चालना, मिळावी ह्यासाठी हार्डि ह्यांच्या प्रयत्नाने रामानुजनला सन १९१३साली इंग्लंड येथील केंब्रिज ट्रिनीटी विद्यापीठात प्रवेश मिळाला. कॉलेजांत असताना अवघ्या तिनं वर्षात गणित ह्या विषयावर त्यांनी ३२ संशोधनपर अप्रतिम लेख लिहिले.. अन् ,सन,१९१८साली रॉयल सोसायटीचे सदस्यत्व,अन् त्यामुळे केंब्रिजची फेलोशिप मिळवनारे ते एकमेव भारतीय ठरले होते.. त्यांचं गणित ह्या विषयावरचं ज्ञांन हे ईश्वरनिष्ठां आणि तर्कशुद्ध पद्धतीचं संमिश्र असं मिश्रण होतं. वयाच्या तिसाव्या वर्षी फेलोसिप मिळवुन भारतांत परतले. पन,परदेशांत असताना,शाकाहारी भोजनाची आबाळ झाल्याने त्यांना क्षयासारखा असाध्य आजार जडला होता.वयाच्या बत्तिसाव्या वर्षीच हा थोर असा असामान्य,गणितज्ञ ,आपल्या गणिती ज्ञानाचं भंडार जगासाठी देवुन गेला…
खरं तर, रामानुजनसारखे दैवी देणगी लाभलेले व्यक्तीमत्व आपल्या देशात जन्माला येणे ही भाग्याची गोष्ट आहे. अन् अशा अनेक दैवी शक्तीची देणगी हे भारतदेशाचं वैभव आहे. अशा वैभवशाली देशाचं अन् वैभवशाली दैवीविभुतींच्या कार्याचा गौरव करणे हे आपले कर्तव्य ठरते..
©️श्री-जगन्नाथ खराटे-ठाणे
-२२डिसें२०२२