You are currently viewing येशू ख्रिस्त जन्मोत्सव निमित्ताने कणकवलीत मिरवणूक

येशू ख्रिस्त जन्मोत्सव निमित्ताने कणकवलीत मिरवणूक

कणकवली

येशू ख्रिस्त जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहर आणि परिसरातील ख्रिस्ती बांधवांनी आज कणकवली शहरातून मिरवणूक काढली. यात वरवडे फणसनगर तसेच तालुक्यातील विविध चर्चचे पदाधिकारी आणि धर्मगुरू सहभागी झाले होते. येशूचा प्रेमाचा आणि शांततेचा संदेश देत कणकवली पटकी देवी मंदिर ते पटवर्धन चौकापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. भक्तीगीते आणि प्रेमाच्या संदेशामुळे शहरात ख्रिसमसचे वातावरण निर्माण झाले होते.संपूर्ण जगातील परस्परांमधील मत्सर, राग विरून जावा आणि सर्वांमध्ये आपुलकी, प्रेम नांदावे. यातूनच सर्वत्र शांतता नांदेल, हा येशूचा संदेश देण्यासाठी ख्रिसमसच्या निमित्ताने ख्रिस्ती बांधवांकडून शहरात या रॅलीचे आयोजन केले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा