You are currently viewing उद्या व्यापाऱ्यांसाठी कुडाळ येथे शिबिराचे आयोजन

उद्या व्यापाऱ्यांसाठी कुडाळ येथे शिबिराचे आयोजन

कुडाळ बाजारपेठेतील व गावातील सर्व किरकोळ व घाऊक व्यापारी, हॉटेल व्यवसायिक व फिरत्या विक्रेत्यांना एक महिना अगोदर नोंदणी व परवाना नूतनीकरण बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने कुडाळ शहर व तालुक्यातील व्यापाऱ्यांसाठी ७ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत येथील व्यापार भवन येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

यामध्ये किराणा, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, बेकरी, कोल्ड्रिंक्स व्यापारी, पान स्टॉल, स्टॉलधारक, घरगुती खानावळ, मत्स्य विक्रेते, मांस व मटण विक्रेते, खाद्यपदार्थ उत्पादक व विक्रेते, धाबा व फिरते विक्रेते, आईस्कीम विक्रेते यांना डिसेंबर २०२१ व जानेवारी २०२२ पर्यंत संपणाऱ्या नोंदणी व परवान्याचे नूतनीकरण एक महिना अगोदर करणे जरुरीचे आहे. तसे न केल्यास प्रतिदिनी १०० रुपये दंड भरावा लागणार आहे. ही नोंदणी व नूतनीकरण परवान्याबाबत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल ९५४५८९८९८९ येथे संपर्क साधावा, असे आवाहन कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट व सचिव भूषण मटकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =