You are currently viewing पंचक्रोशी हेल्पग्रुप कडून निराधार आजारी युवकाला मदत..

पंचक्रोशी हेल्पग्रुप कडून निराधार आजारी युवकाला मदत..

पंचक्रोशी हेल्पग्रुप कडून या युवकासाठी मदतीचे आवाहन..

वेंगुर्ले

म्हापण येथील सुदेश सदाशिव पाटकर यांना पंचक्रोशी हेल्पग्रुप कडून उपचारासाठी ५००० रूपयांची मदत करण्यास आली आहे. सुदेश पाटकर यांच्या आई वडिलांचे निधन झालेले असून त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. सुदेश पाटकर हे गेली जवळपास २ वर्षे आजारी आहेत. त्यांच्या पुढील उपचारासाठी पंचक्रोशती हेल्पग्रुप कडून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना कुणाला त्यांना मदत करायची असेल त्यांनी ९४२२८५३९०९ या क्रमांकावर संपर्क साधावा. आपण केलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा