You are currently viewing ओटवणे येथील युवकाचे निधन

ओटवणे येथील युवकाचे निधन

ओटवणे

ओटवणे नविन जाधववाडी येथील युवक विजय उत्तम जाधव वय ३७ याचे गोवा बांबुळी येथे उपचारा दरम्यान दुःख निधन झाले. गोवा येथे कामानिमित्त असणाऱ्या विजय याला चार पाच वर्षापूर्वी पॅरालीस चा झटका आला होता.आजारपण आणि हलाकीच्या परिस्थितीत जगत असताना गोवा येथे राहणे शक्यच नसल्याने आजारानंतर तो ओटवणे येथेच आई वडील आणि कुटुंबासह राहत होता दहा दिवसापूर्वी त्याची तब्बेत अचानक बिघडली अत्यवस्थ अवस्थेत त्याला गोवा बांबूळी येथे हलविण्यात आले होते. त्याठिकाणी त्याच्यावर शस्त्र क्रियाही करण्यात आली होती. मात्र ब्रेन ह्यामरेज मुळे तो कोमा मध्ये गेला त्यानंर तो शुध्दीवरही आला नाही दहा दिवस वेंटीलेटर वर मृत्यूशी झुंज देणाऱ्या विजयची मृत्यूशी झुंज अखेर व्यर्थ ठरली. रविवारी पहाटे त्याचे दुःखद निधन झाले.

एकुलता एक असणाऱ्या विजयच्या मागे आई वडील दोन बहिणी, भावोजी ,पत्नी, लहान मुलगा मुलगी, काकी, चुलत भाऊ चुलत बहिण असा मोठा परिवार आहे. अत्यंत प्रेमळ आणि मनमिळाऊ असणाऱ्या विजयच्या अकाली जाण्याने जाधव कुटुंबियांवर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला आहे त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. येथिल सूर्यकांत जाधव यांचा तो चुलत भाऊ होय.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + three =