You are currently viewing भिल्लवाडी ग्रुप मळगाव आयोजित १ जानेवारी रोजी मळगाव येथे भव्य पुरुष रस्सीखेच स्पर्धा

भिल्लवाडी ग्रुप मळगाव आयोजित १ जानेवारी रोजी मळगाव येथे भव्य पुरुष रस्सीखेच स्पर्धा

सावंतवाडी

भिल्लवाडी ग्रुप मळगाव, सावंतवाडीच्यावतीने भव्य दिव्य अशी खुली पुरुष रस्सीखेच स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ४ वाजता आझाद मैदान मळगाव येथे होणार आहे.

दरम्यान या खुल्या पुरुष गटासाठी प्रथम पारितोषिक २१ हजार १११ रुपये, द्वितीय पारितोषिक १५ हजार १११ रुपये आणि तृतीय पारितोषिक ५ हजार १११ तसेच प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

खुल्या पुरुष गटातील बेस्ट फ्रेंड मॅन २ हजार १११आणि बेस्ट लास्ट मॅन २ हजार १११ तसेच प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.


तरी इच्छुक संघाने अधिक माहितीसाठी भिल्लवाडी ग्रुपचे सदस्य पांडुरंग ९६१९२०२६८७, दिपेश ८९७५८४४९८९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा