पंचक्रोशीतील शंभर पेक्षा जास्त नागरीकांनी घेतला लाभ.
साईलिला हॉस्पिटल नाटळ आणि माता वैष्णोदेवी महाविद्यालय ओसरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोग निदान व औषोधोचार शिबीर संपन्न झाले.
या आरोग्य शिबीराचा लाभ ओसरगांव, वागदे, बोर्डवे, कळसूली, कसाल, हेवाळे या पंचक्रोशीतील नागरीकांनी घेतला.महाविद्यालयाच्या वतीने ग्रामस्थांकरीता शिबीर स्थळी येण्याजाण्याकरीता विशेष बस व्यवस्था करण्यात आली होती. या शिबीरामध्ये सी.बी.सी (रक्ताच्या 18 चाचण्या), ब्लड शुगर चेकींग, सिरम कोलेस्ट्रॉल, सिरम ट्रायग्लीसराईड, सिरम एल.डी.एल.,किडनी चाचण्या, लिव्हर फंक्शन टेस्ट, विविध त्वचा रोग चाचण्या करण्यात आल्या.यावेळी साई लीला हॉस्पिटलचे डॉ. सतिश गोसावी (एमबीबीएस,डीएनबी,फेलोशीप इन डायबेटीस, फीजिशियन) व डॉ. सुधीर सांबारे,जनरल फीजीशीयन, मधुमेह व त्वाचारोग तज्ञ हे उपस्थीत होते.सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंन्त आरोग्य तपासणी करण्यात आली. उदघाटन कार्यक्रमात बोलतांना डॉ. सतिश गोसावी यांनी उपस्थीतांना आपल्या आरोग्याबाबतीत जागरुक असणे कीती महत्वाचे असते याबाबतीत सवीस्तर माहीती दीली. डॉ. सुधीर सांबारे यांनी आरोग्य तपासणीचे महत्व समजावून सांगतीना योग्य वेळी रोगाचे निदान झाले तर त्याचे फायदे रुग्णांनाच होतात भविष्यात होणा-या त्रासापासून वाचता येते. याकरीता आपल्या आरोग्याबाबत जागरुक असणे महत्वाचे असते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी म्हणाले की बदललेल्या जिवनशैलीत आपण वेगवेगळया रोगांना आमंत्रणच देत असतो. अनेक वेळा आपल्याला वाटते की मला काय झालेय मात्र हीच गोष्टी आपणांस भविष्यात त्रासदायक ठरु शकते त्यामुळे ठरावीक कालावधीनंतर आपणांस आपली आरोग्य तपासणी करणे महत्वाचे असते. यावेळी महाविद्यालयाचे व्यपस्थापक श्री. संतोष सावंत, तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग या कार्यक्रमास उपस्थीत होते. तसेच साईलीला हॉस्पिटलचे सचीन घाडीगांवकर, सर्व स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशन्स, वॉर्डबॉय उपस्थीत होते. या उदघाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.कु. सिध्दी कांबळी तर आभारप्रदर्शन प्रा.कु. श्रुती कोदे यांनी केले. या शिबीराचा लाभ पंचक्रोशीतील 148 नागरीकांनी घेतला.