You are currently viewing कोलगाव येथील विधान परवार याचे उपचारा दरम्यान निधन

कोलगाव येथील विधान परवार याचे उपचारा दरम्यान निधन

झाराप येथे झाला होता अपघात

सावंतवाडी

थांबलेल्या इनोव्हा कारला बोलेरो पिकअपची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात सावंतवाडी कोलगाव येथील विधान परवार याचे गोवा बांबळी येथे उपचारा दरम्यान निधन झाले.

याबाबतची अधिक माहिती अशी की झाराप येथे थांबलेल्या इनोवा कारला बोलेरो पिकप गाडीने जोरदार धडक दिली होती. यात विधान परवार हा गंभीर जखमी झाला होता.त्यांच्यावर गोवा बांबूळी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची आज पहाटे प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सर्वत्र कोलगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा