सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण मधून 40.29 हेक्टर जमीन वगळण्याचा प्रस्ताव मंजूर..
सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना २ एप्रिल १९९८ मध्ये झाली. यामध्ये मौजे ओरोस (बु), मौजे रानबांबुळी व मौजे अणाव या गावांचा समावेश आहे. त्यावेळी ओरोस (बु) मधील जवळपास ४५ हेक्टर क्षेत्र सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकराणामध्ये आरक्षित करण्यात आले होते. हे क्षेत्र वगळण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी त्यासाठी खास प्रयत्न केले. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गालगतची पश्चिम बाजू आणि नाला यामधील सुमारे ४५ हेक्टर क्षेत्र वगळण्या साठीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. ओरोस (बु) मधील जनतेच्या अनेक वर्षाच्या मागणीला माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे. सिंधुदुर्गनगरी नवनगरासाठी अधिसूचित केलेल्या क्षेत्रामधून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम बाजू आणि नाला यामधील महामार्गात गेलेले क्षेत्र सोडून सर्वे नं. ३७ ते ५१ मध्ये येणारे सुमारे ४०.२९.२५ हेक्टर आर क्षेत्र वगळण्यात आल्याची अधिसूचना २९ नोव्हेंबर २०२२ रोजी शिंदे सरकारने काढली आहे. सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी खास प्रयत्न केले. म्हणून ओरोस (बु) मधील जनतेने समाधान व्यक्त करून माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे विशेष आभार मानले आहेत.