You are currently viewing आपलेच निघाले गद्दार… ज्यांच्यावर ठेवला विश्वास त्यांनीच केला विश्वासघात…

आपलेच निघाले गद्दार… ज्यांच्यावर ठेवला विश्वास त्यांनीच केला विश्वासघात…

समीर नाईक; युवा सेनेच्या पदाचा राजीनामा देऊन लवकरच राजकारणाला सोडचिट्टी…

बांदा:

कधीही पक्षीय राजकारण न करता रात्री-अपरात्री प्रत्येकाच्या वेळप्रसंगाला धावून जात सहकार्य केले. जिवाची पर्वा न करता गंभीर रुग्णांना घेऊन सुद्धा दवाखान्यापर्यंत गेलो. परंतु ज्यांच्यावर भरोसा ठेवला त्यांनीच गद्दारी केली, असे सांगत आपण सर्वच राजकारणाला सोडचिट्टी देत असल्याचे युवासेना मळेवाड विभागप्रमुख समीर नाईक यांनी सांगितले.

श्री.नाईक म्हणाले की…गेली दहा वर्षे केणीवाडीतील सामाजिक कार्यात पुढाकार घेतला.ग्रामस्थांना अपेक्षित कामे केली.केवळ एका वाडीचाच विचार न करता संपूर्ण गावासह परिसरातील नागरिकांच्या मदतीला स्वतःचा कामधंदा बाजूला ठेवत वेळ, कार्य,प्रसंगाला धाऊन गेलो.परराज्यात नोकरी करणाऱ्यांच्या एका फोनवर आपण त्यांच्या नातेवाईकांना दवाखान्यात नेले.परंतु ज्यावेळी मला गरज होती त्यावेळी आपलेच गद्दार निघाले.अश्या गद्दारांना सहकार्य किंवा मदत करण्यापेक्षा राजकारणातूनच संन्यास घेतलेला बरा.असे समीर नाईक यांनी सांगितले.तसेच लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा