You are currently viewing सुकळवाड मठाच्या बाजूला पुन्हा जुगाराची मोठी बैठक…

सुकळवाड मठाच्या बाजूला पुन्हा जुगाराची मोठी बैठक…

*खाकीच्या शिलेदारांच्या कुशीतील बैठकीत ४७ तक्षिमदार*

मालवण :

 

ओरोस जिल्हा पोलीस मुख्यालयापासून काहीच अंतरावरील सुकळवाड येथील एका मठाच्या बाजूला जिल्ह्यातील नामांकित जुगाऱ्यांची मोठी तकशीम बसत आहे.. काल रात्री दात पडक्या आप्पाच्या दारू ओढणाऱ्या ड्राइवर च्या नावावर जम्बो तकशीम बसली होती. या जम्बो तकशीमेत तब्बल ४७ जणांचा सहभाग होता.

फोंडयाच्या पारावरच्या विठ्ठलाचीही तकशीम होती. यात जिल्ह्यातील नावाजलेले जुगारी सुभाष, अक्षय, मळेवाडचा दादा, मुख्य सूत्रधार पाटलांचा हनुमान, ओली कोथिंबीर, संजा, धनो असे तब्बल ४७ तकशीमदार होते. मोठी तकशीम असल्यावर भागवाभागवी सुद्धा मोठीच असते. त्यामुळे खाकीच्या शिलेदाऱ्यांच्या अगदी कुशीत जरी बैठक बसली तरी त्याकडे दुर्लक्ष केला जातो.

कालच्या सुकळवाड येथील बैठकीमध्ये पटाच्या मागील मुख्य सूत्रधार होता तो म्हणजे पाटलांचा वज्र हनुमान मारुती. प्रत्येक तकशीमदारांना कालच्या बैठकीतून ७७००/- वाट्याला आले.

कालपासून सुरू झालेला जुगाराच्या बैठकीचा सिलसिला रोजच सुरू राहणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. जुगारातून तकशीम दारांना फायदा होतोच परंतु त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या खाकी वर्दीतील छुप्या रुस्तमांचा मात्र भरपूर फायदा होतो. त्यामुळे *आज संध्याकाळी ४.00 वाजता सुरू होणारा जुगाराचा खेळ म्हणजे जुगाऱ्यांची जत्राच आणि खाकीचा दशावतार.*

ओरोस मुख्यालयापासून अवघ्या काहीच अंतरावर सुरू असलेला हा जुगाराचा अड्डा म्हणजे पाहणाऱ्यांसाठी आश्चर्याचा धक्काच असतो. कारण आपल्या शेजारीच काय घडतं हे आपल्याला माहिती नसेल तर संपूर्ण जिल्ह्याची सुरक्षा खाकीचे रखवाले कशी काय करणार? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =